मुग डाळ हलवा/Moong Dal Halwa/vibsk–50
साहित्य:-
साहित्य | : | मात्रा | |
1. | धुतलेली मुग डाळ | : | 200 ग्रँम (रात्रभर भिजवलेली) |
2. | मावा /खवा | : | 100 ग्रँम |
3. | शुद्ध घी /तूप | : | 200 ग्रँम |
4. | साखर | : | 150 ग्रँम/चवीनुसार |
5. | दूध | : | 1 छोटाग्लास |
6. | किशमिश | : | 3 छोटा चमचा |
7. | बदाम | : | 10 -15 |
8. | काजू | : | 10 -15 |
9. | पिस्ता | : | 8-10 |
विधिः
- मुग डाळ मिक्सी मध्ये पाण्याशिवाय बारीक वाटून घ्या l
- पिस्ता आणि बदाम पातळ कापून घ्या l काजूचे अर्धे अर्धे तुकडे करून घ्या l
- एका कढईत तूप (घी) आणि वाटलेली मुग डाळ चांगल्याप्रकारे मिक्स करून मंद आचेवर भाजून घ्या l
- सुरवातीला मुग डाळ कढईला चीटकेल l खरडवून खरडवून भाजत जाणेl सतत हलवत ठेवून भाजत जाणे l मुग डाळ भाजण्यासाठी किमान 15-20 मिनटे लागतात l
- जेव्हा मुग डाळ कढईला चिटकने सोडू लागेल आणि तूप ही मुग डाळीपासुन अलग दिसू लागले कि समजावे मुग डाळ भाजून झाली आहे l
- आता काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश कढईत टाका आणि मूड डाळ बरोबर 1 मिनट पर्यंत बाजून घ्या lकाजू आणि पिस्ता नंतर सजवण्यासाठी शिल्लक ठेवा l
- दुध घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l तो पर्यंत शिअवा, जो पर्यंत मूगडाळ पूर्ण दुध शोषत नाही l
- त्यानंतर खवा (मावा) घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- आता चवीनुसार साखर घालून मिक्स करा l
- साखर घातल्यानंतर 1 मिनट पर्यंत शिजवून आचेवरून उतरवा l हलवा गरम आहे, साखर विरघलायला जास्त वेळ नाही लागत l चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या l
- मुगडाळ हलवा तयार आहे l
काजु, पिस्ता आणि बदाम ने सजवून गरमागरम सर्व्ह करा l
Watch Video Here: