चटपटे सूखे काले चने/ चटपटीत सुखे काळे चणे/Spicy Dry Black Gram/vibsk–19
Read This Recipe In English: Spicy Dry Black Gram
सहित्य:-
| सहित्य | मात्रा | ||
| 1 | काळे चणे | : | 200 ग्राँम ( भिजवलेले ) |
| 2 | कांदे | : | 2 (उभे पातळ चिरलेले ) |
| 3 | टोम्याटो | : | 2 (उभे पातळ चिरलेले ) |
| 4 | हिरवी मिरची | : | 7 -8 (उभे तुकडे ) |
| 5 | कोथिंबीर | : | बारीक़ कापलेली |
| 6. | लाल मिरची पावडर | : | 1 चमचा |
| 7. | आमचूर पाउडर( कोकम ) | : | ½ चमचा |
| 8. | हिंग | : | ½, चमचा |
| 9. | ज़ीरा | : | 1½ चमचा |
| 10. | भाजलेली ज़ीरा पावडर | : | 1½ चमचा |
| 11. | धने पाऊडर | : | 1½ चमचा |
| 12. | मीठ | : | चवीनुसार |
| 13. | चाट मसाला | : | 1½ चमचा |
| 14. | लिंबू | : | 1 |
| 15. | तेल | : | 1 मोठा चमचा |
चटपटीत सूखे काळे चणे बनवायची विधि:
- काळे चणे 8 ते 10 तास भिजविण्यास ठेवा ।
- कांदा आणि टोम्याटो चंद्रकोर सारखे कापून एका बाजूला ठेवा ।
- हिरवी मिरची उभी चीरुन दोन भागात कापून एका बाजूला ठेवा ।
- कोथिंबीर बारीक कापलेली एका बाजूला ठेवा ।
- भिजवलेल्या चण्यातून पाणी काढून प्रेशर कुकर मध्ये टाका ।
- चण्यात थोडेसे वर पर्यंत पाणी टाका । मीठ आणि हिंग टाका
- प्रेशर कुकर एक सीटी होईपर्यंत जलद आचेवर शिजवा
- सीटी झाली कि 15 मिनटे मंद आचे वर शिजवा ।
- उकडलेले चण्यातून अर्धे चणे काढून फोडून घ्या ।
- बाकी चणे न फोडता काढा व फोडलेले चणे त्यात टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
- आता ह्यात थोडेसे चण्याचे उकळलेले पाणी टाकून मिक्स करा ।
- आता चण्यामध्ये मीठ, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर , भाजलेली जिरे पावडर, आणि चाटमसाला घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
- ½ लिंबू पिळून चण्यात मिक्स करा ।
- फोडणीसाठी तेल गरम करून आचेला मंद करा ।
- जिरे, हिंग आणि धने पावडर टाका आणि हलवा ।
- फोडणी चण्यावर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा।
- फोडणी टाकल्यानंतर कापलेली कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
- नंतर कापलेला कांदा, हिरवी मिरची, टोम्याटो वरून टाकून सजवा ।
- भाजलेली जिरे पावडर, मीठ, चाट मसाला वरून टाका ।
- आता त्यात वरून अर्धा लिंबू पीळा ।
- सुखे चटपटीत काळे चणे तय्यार आहेत ।
चटपटीत सुखे काळे चणे आपण नाश्त्या मध्ये पुरी/ पराठा सोबत सर्व्ह करू शकता । अथवा असेही खाऊ शकता । हा एक संपूर्ण आहार आहे ।
Watch The Video Here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1

1. काळे चणे 8 ते 10 तास भिजविण्यास ठेवा ।
Step-2

2. कांदा आणि टोम्याटो चंद्रकोर सारखे कापून एका बाजूला ठेवा । हिरवी मिरची उभी चीरुन दोन भागात कापून एका बाजूला ठेवा । कोथिंबीर बारीक कापलेली एका बाजूला ठेवा ।
Step-3

3. भिजवलेल्या चण्यातून पाणी काढून प्रेशर कुकर मध्ये टाका । चण्यात थोडेसे वर पर्यंत पाणी टाका । मीठ आणि हिंग टाका प्रेशर कुकर एक सीटी होईपर्यंत जलद आचेवर शिजवा। सीटी झाली कि 15 मिनटे मंद आचे वर शिजवा ।
Step-4

4. उकडलेले चण्यातून अर्धे चणे काढून फोडून घ्या । बाकी चणे न फोडता काढा व फोडलेले चणे त्यात टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा । आता ह्यात थोडेसे चण्याचे उकळलेले पाणी टाकून मिक्स करा ।
Step-5

5. आता चण्यामध्ये मीठ, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर , भाजलेली जिरे पावडर, आणि चाटमसाला घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
Step-6

6. ½ लिंबू पिळून चण्यात मिक्स करा ।
Step-7

7. फोडणीसाठी तेल गरम करून आचेला मंद करा । जिरे, हिंग आणि धने पावडर टाका आणि हलवा । फोडणी चण्यावर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा।
Step-8

8. फोडणी टाकल्यानंतर कापलेली कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा ।
Step-9

9. नंतर कापलेला कांदा, हिरवी मिरची, टोम्याटो वरून टाकून सजवा ।
Step-10

10. भाजलेली जिरे पावडर, मीठ, चाट मसाला वरून टाका ।
Step-11
11. आता त्यात वरून अर्धा लिंबू पीळा । सुखे चटपटीत काळे चणे तय्यार आहेत ।

चटपटीत सुखे काळे चणे आपण नाश्त्या मध्ये पुरी/ पराठा सोबत सर्व्ह करू शकता । अथवा असेही खाऊ शकता । हा एक संपूर्ण आहार आहे ।










