उपासाची मखान्याची खीर /Fox Nut Pudding/vibsk-40
साहित्य:-
| साहित्य | मात्रा | ||
| 1 | मखाने | : | 1 वाटी |
| 2 | दूध | : | 1 लीटर |
| 3 | साखर | : | चवीनुसार |
| 4 | बदाम | : | 15 -20 (कापलेले) |
| 5 | पिस्ता | : | 20 ग्राम (कापलेले) |
| 6 | काजू | : | 15 -20 (कापलेले) |
| 7 | शुद्ध तुप | : | 2 छोटे चमचे |
कृती ;
- एक वजनदार खोलगट भांडयात तुप घाला l मध्यम आचे वर गरम करून घ्या l
- ह्यात मखाने घालून भाजून घ्या l जास्त भाजू नका l
- मखाने भाजून झाले कि दूध घाला l दूध जलद आचे वर उकळवा l
- उकळल्यानंतर आच मंद करा l दूध घट्ट होई पर्यंत शिजवा l मधे मधे हलवत रहा l
- उकळताना,दुधाची घट्ट साय भांड्याच्या किनाऱ्यावर जमा होते l ती साय पळीने खरडवून दुधात मिक्स करत रहा l
- बदाम आणि काजू घालून, दुध थोडे घट्ट होई पर्यंत शिजवा l
- जेव्हा दूध थोडे कमी झाले कि, त्यात साखर घालून ढवळत रहा l 5 मिनटे शिजवा l आता आच बंद करा l
- उपासाची मखान्याची खीर तयार आहे l
- पिस्ता घालून सजवून घ्या आणि सर्व्ह करा l
थंड किंवा गरम , कसेही सर्व्ह करा l मखान्याची खीर दोन्ही तर्हेने स्वादिष्ट लागते l
Watch video here:







