उपासाची मखान्याची खीर /Fox Nut Pudding/vibsk-40

0
491

उपासाची मखान्याची खीर /Fox Nut Pudding/vibsk-40

साहित्य:-

  साहित्य   मात्रा
1 मखाने : 1 वाटी
2 दूध : 1 लीटर
3 साखर : चवीनुसार
4 बदाम : 15 -20 (कापलेले)
5 पिस्ता : 20 ग्राम (कापलेले)
6 काजू : 15 -20 (कापलेले)
7 शुद्ध तुप : 2 छोटे चमचे

 

कृती ;

  1. एक वजनदार खोलगट भांडयात तुप घाला l मध्यम आचे वर गरम करून घ्या l
  2. ह्यात मखाने घालून भाजून घ्या l जास्त भाजू नका l
  3. मखाने भाजून झाले कि दूध घाला l दूध जलद आचे वर उकळवा l
  4. उकळल्यानंतर आच मंद करा l दूध घट्ट होई पर्यंत शिजवा l मधे मधे हलवत रहा l
  5. उकळताना,दुधाची घट्ट साय भांड्याच्या किनाऱ्यावर जमा होते l ती साय पळीने खरडवून दुधात मिक्स करत रहा l
  6. बदाम आणि काजू घालून, दुध थोडे घट्ट होई पर्यंत शिजवा l
  7. जेव्हा दूध थोडे कमी झाले कि, त्यात साखर घालून ढवळत रहा l 5 मिनटे शिजवा l आता आच बंद करा l
  8. उपासाची मखान्याची खीर तयार आहे l
  9. पिस्ता घालून सजवून घ्या आणि सर्व्ह करा l

 थंड किंवा गरम , कसेही सर्व्ह करा l मखान्याची खीर दोन्ही तर्हेने  स्वादिष्ट लागते l

Watch video here:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here