उडीद डाळची कचौरी/Khasta Urad Dal Kachauri/vibsk-49
साहित्य:-
बाहेरील आवरण (खोल)बनविण्यासाठी
साहित्य | : | मात्रा | |
1. | मैदा | : | ½, किलो ग्रँम |
2. | ओवा (अजवाइन) | : | 2 छोटा चमचा |
3. | मीठ | : | ½ छोटा चमचा |
4. | शुध्द तूप | : | 200 ग्रँम (मळताना) |
5. | पाणी | : |
भरण्यासाठी मसाला
साहित्य | : | मात्रा | |
1. | उडीदडाळ | : | 250 ग्राम (भीजवलेली) |
2. | अख्खे धने | : | 4-5 छोटे चमचे (भाजलेले आणि जाडसरकुटलेले) |
3. | हळद | : | ½ छोटाचमचा |
4. | हिंग | : | 2 छोटे चमचे |
5. | काळीमिरची पावडर | : | 2 छोटेचमचे |
6. | लालमिरची पावडर | : | 3-4 छोटेचमचे |
7. | गरम मसाला | : | 1 छोटाचमचा |
8. | धणे पावडर | : | 5-6 छोटेचमचे |
9. | मीठ | : | चवीनुसार |
10. | लसूण | : | 2 छोटेचमचे (जाडसर कुटलेले) |
11. | आले | : | 3 छोटेचमचे (किसलेले) |
12. | शुध्द तूप/तेल | : | तळण्यासाठी |
बाहेरील आवरण (खोल) बनविण्याची विधि;
- एका भांड्यात मैदा घ्या l
- ओवा, मीठ आणि तूप (घी) घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- चांगल्या प्रकारेमिक्स करा कि पिठ मळणीयुक्त दिसू लागेल l
- थोडे पाणी मिळवून पिठ कठीण मळून घ्या l
- ळलेल्या मैद्याला 10 मिनटे एका बाजूला ठेवा l
भरण्यासाठी मसाल्याची विधि;
- भरण्यासाठी मसाला बनवताना सर्वात प्रथम, भिजवलेली उडीदडाल मिक्सी मधे जाडसर वाटून एका बाजूला ठेवा l
- कढईत तूप/तेल गरम करा l लसूण आणि आले घालून भाजून घ्या l
- आच मंद करा l भाजलेले आणि कुटलेले अख्खे धने त्यात घाला l
- 1/2 मिनटे भाजल्यानंतर वाटलेली उडीद डाल घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- सतत हलवत ठेवून मध्यम आचेवर भाजून घ्या l 4-5 मिनटे भाजल्यानंतर आच मंद करून भाजा l
- जेव्हा उडीद डाल थोडीसी भाजून झाली,कि त्यात धणे पावडर, हिंग,हळद पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ घाला l
- चांगल्या प्रकारे मिक्सकरून मंद आचेवर भाजून घ्या l मसाला सुखा होईपर्यंत भाजून घ्या l
- भरण्यासाठी मसाला तयार आहे l त्याला आचेवरून उतरवून थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवा l
कचौरी बनविण्यासाठी :
- कचौरी भरन्या अगोदर , मैदा एकदा पुन्हा मळून घ्या l
- छोटे छोटे गोळे तोडून. हाताच्या मदतीने गोळे बनवून घ्या l
- गोल पसरवून त्यामधोमध मसाला भरुन कचौरी बंद करा l
- तर हलका दबाव देऊन कचौरी पसरवा l लक्षात ठेवा , आत मसाला सुखा आहे, जास्त जोर दिल्याने कचौरी फाटू शकतात l
- तळण्यापूर्वी सर्व कचौरी भरुन घ्या l
- मोठ्या कचौरीसाठी, गोळा थोडा मोठा घेणे l बाकी विधि छोट्या कचौरीसाठी तसेच आहे l
- कचौरी तळण्यासाठी खोलगट पैन किंवा कढईत, जलद आचेवर तेल गरम करणे l
- आच मध्यम करा l कचौरी ध्यानपूर्वक कढईत सोडा l
- हलके हलके हलवत राहा ज्याने कचौरी तळाला व साईटला लागू नये l हलवत राहिल्याने कचौरी सर्व बाजूने बरोबर शेकतील l सोनेरी लाल होईपर्यंत तळा नंतर कढईतून बाहेर काढा l
- मोठी कचौरी पण ह्याचप्रमाणे सोनेरी लालहोईपर्यंत तला l
- कुरकुरीत-खमंगदार कचौरी तयार आहेत l
कुरकुरीत खमंगदार कचौरी सॉस/चटणी आणि चहा बरोबर गरमागरम सर्व्ह करा l
Watch Video Here: