मटार बटाटे पुलाव/Matar-Aloo Pulao/vibsk –34
साहित्य :-
साहित्य | मात्रा | ||
1 | मटार | : | एक वाटी |
2 | बटाटे | : | 2 मध्यम आकाराचे |
3 | गाजर | : | 1 छोटे |
4 | कांदे | : | 2 छोटे |
5 | टोमॅटो | : | 1 मोठ्या आकाराचे |
6 | हिरवी मिरची | : | 2 |
7 | कोथिंबीर | : | सजावटी साठी |
8 | तांदूळ | : | 500 ग्रॅम |
9 | हळद पावडर | : | ½ छोटा चमचा |
10 | लाल मिरची पावडर | : | 1 छोटा चमचा |
11 | मोठी वेलची | : | 1 |
12 | अख्खी काळी मिरची | : | 7-8 |
13 | लवंग | : | 5-6 |
14 | ज़ीरे | : | ¼ छोटा चमचा |
15 | मीठ | : | चवीनुसार |
16 | शुद्ध तूप | : | 1 छोटा चमचा |
17 | तेल | : | 1 मोठा चमचा |
कृती ;
- तांदूळ धुवून एका बाजूला ठेवा l
- एका प्रेशर कुकर मध्ये तेल गरम करा l
- गरम तेलात जिरं, मोठी वेलची, लवंग आणो अख्खी लाल मिरची घाला l
- जेव्हा हे सर्व तडकू लागले कि , तेव्हा कापलेला कांदा टाकून भाजून घ्या l आचेला मध्यम करा l
- हिरवी मिरची घालुनl कांदा नरम होई पर्यंत भाजा l
- आता, हिरवे मटार , कापलेले बटाटे आणि गाजर घाला l चांगल्या प्रकारे मिश्रण करून 2 मिनटे शिजवा l
- टोमॅटो घालून मिश्रण करा l त्यानंतर हळद , लाल मिरची पावडर आणि मीठ घाला l चांगल्या प्रकारे मिश्रण करून 3 मिनटे शिजवून घ्या l
- आता , धुतलेले तांदूळ प्रेशर कुकर मध्ये घाला आणि चांगल्या प्रकारे भाजी सोबत मिश्रण करा l तूप घालुन मिश्रण करा l
- त्यानंतर अडीज ( 2½ ) ग्लास पाणी घालून मिश्रण करा l । प्रेशर कुकरचे झाकण बंद करून जलद आचेवर एक सिटी होई पर्यंत शिजवा |
- पुलाव तयार आहे l भाजी ,कुकरच्या वरती येतात l तेव्हा हलक्या हाताने भाजी आणि भात एकत्र मिश्रण करा l
- एका भांडयात पुलाव काढून कोथिंबीरने सजवून घ्या l
आपल्याला आवडत असलेले लोणचे किंवा कोशिंबीर सोबत गरम गरम सर्व्ह करा l
Watch video here: