भरलेले कारले–स्टाइल-1/Bharwa Karele-Style-1/vibsk-33
साहित्य ;-
साहित्य | मात्रा | |
1 | कारले | 6 -7 (मध्यम आकाराचे) |
2 | कैरी | 1 मोठी (किसलेलि) |
3 | आले /लसणाची पेस्ट | 4 छोटे चमचे |
4 | कांदे | 3 छोटे (बारीक कापलेले) |
5 | लाल मिरची पावडर | 2 छोटे चमचे |
6 | हळद पावडर | 1½ छोटे चमचे |
7 | धने पावडर | 3 -4 छोटे चमचे |
8 | गरम मसाला | 1½ छोटे चमचे |
9 | पाच प्रकारचे मसाले * | 1½ छोटे चमचे |
10 | मीठ | चवीनुसार |
11 | मोहरीचे तेल | 2 मोठे चमचे |
*पाच मसाले पाच तऱ्हेच्या दाण्यांच मिश्रण – कलौंजी, बडीशेप, मेथीचे दाणे,जिरे आणि मोहरीचे दाणे (एका मात्रात)
कृती ;
- कारले सोलून घ्या l कारल्यात उभी चीर पाडावी l गर आणि बिया काढून घ्या l साल आणि गर नरम बिया एका बाजूला ठेवा l कडक बिया फेकून द्या l
- कैरी सोलून किसून घ्या आणि एका बाजूला ठेवा l
- कढईत मोहरीचे तेल घालून जलद आचेवर गरम करा l
- आचेला मध्यम करून गर आणि बिया काढलेले कारले तळून घ्या l
- शिजेपर्यंत सर्व कारले तळून घ्या l
- तळल्यानंतर कारले कढईतून काढून एका बाजूला ठेवा l
- त्याच तेलात पाच प्रकारचे मसाले घाला l मसाले तडकू लागले कि, लसून – आल्याची पेस्ट घाला आणि भाजून घ्या l आचेला मंद करून घ्या l
- धने पावडर , गरम मसाला , लाल मिरची पावडर आणि हळद घालून थोडा वेळ हलवत रहा l
- मसाला भाजून झाला कि लसून आल्याची पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स झाले कि त्यात बारीक कापलेले कांदे घालावे l हलवत ठेऊन मध्यम आचे वर 1 मिनटे शिजवा l
- आच मंद करून कांदे नरम होई पर्यंत शिजवा l
- आता कारल्याची साल, नरम बिया आणि किसलेली कैरी घाला l
- मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l झाकण ठेऊन 10 मिनटे मंद आचेवर शिजवा l
- जेव्हा भरन्यासाठी मसाला तयार झाले कि , तेव्हा एका भांड्यात मसाला काढून घ्या l
- मसाले आता तळलेल्या कारल्याच्या चिरलेल्या भागात भरा l
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात गरमागरम सर्व्ह करा l
Watch video here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1