उपासासाठी साबुदाणा खिचडी/Tapioca Pearls Sabudana Khichadi (For Fasting)/vibsk-35

0
401

उपासासाठी साबुदाणा खिचडी/Tapioca Pearls Sabudana Khichadi (For Fasting)/vibsk35

साहित्य :-

  साहित्य   मात्रा
1. साबुदाणे : 100 ग्रॅम 3-4 तास भिजवलेले (एक कप पाण्यामध्ये एक कप साबुदाणा)
2. भाजलेले शेंगदाणे : 50 ग्रॅम
3. हिरवी मिरची /लाल मिरची : 2/2
4. कढीपत्ता : 10 -12
5. जिरं : 1छोटाचमचा
6. काळे मीठ : चवीनुसार
7. कोथिंबीर : सजावटीसाठी
8. उकडलेले बटाटे : 5, छोटया आकाराचे
9. तेल : 1 मोठा चमचा

कृती;

  1. भाजलेले शेंगदाणे जाडसर कुटुन घ्या l कुटलेले शेंगदाणे दोन भागात काढून घ्या l एक भाग भीजवलेल्या साबुदाण्यात घाला l( शिजवन्या अगोदर, शेंगदाणे मिक्स केल्याने साबुदाण्यातील चिकटपणा कमी होतो) l
  2. उकडलेले बटाटयाचे छोटे छोटे तुकडे करून एका बाजूला ठेवा l
  3. कढईत तेल गरम करा l आता जलद आचेवर बटाट्याला सोनेरी आणि कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या l बटाटयांना कढईतून काढून एका बाजूला ठेवा l
  4. आता त्याच तेलामध्ये जीरं भाजून घ्या l आच मंद करा l नंतर त्यात, कापलेली हिरवी लाल मिरची घाला l कढीपत्ता घालून हलवत रहा l
  5. कढईत भिजवलेला साबुदाणा घाला l सतत हलवत ठेऊन शिजवत राहा , जो पर्यंत साबुदाण्याचा सफेद रंग हलका होत नाही l
  6. अर्धे शिजल्यानंतर त्यात काळे मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l सतत हलवत रहा l
  7. साबुदाणा शिजल्या नंतर गॅस बंद करा l आता त्यात तेल आणि कोथिंबीर पट्टी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l
  8. साबुदाणा तयार आहे l एका भांडयात काढून घ्या l कोथिंबीर आणि उरलेले ( भाजलेले ) शेंगदाणे ने सजवून घ्या l

गरमा गरम साबुदाणा खिचडीचा आनंद घ्या l

Watch video here:

Recipe Step By Step With Pics:

Step-1

1. भाजलेले शेंगदाणे जाडसर कुटुन घ्या l कुटलेले शेंगदाणे दोन भागात काढून घ्या l एक भाग        भीजवलेल्या साबुदाण्यात घाला l( शिजवन्या अगोदर, शेंगदाणे मिक्स केल्याने साबुदाण्यातील      चिकटपणा कमी होतो) l

Step-2

2. उकडलेले बटाटयाचे छोटे छोटे तुकडे करून एका बाजूला ठेवा l

Step-3

3. कढईत तेल गरम करा l आता जलद आचेवर बटाट्याला सोनेरी आणि कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या l बटाटयांना कढईतून काढून एका बाजूला ठेवा l

Step-4

4. आता त्याच तेलामध्ये जीरं भाजून घ्या l आच मंद करा l नंतर त्यात, कापलेली हिरवी लाल मिरची घाला l कढीपत्ता घालून हलवत रहा l

Step-5

5. कढईत भिजवलेला साबुदाणा घाला l सतत हलवत ठेऊन शिजवत राहा , जो पर्यंत साबुदाण्याचा सफेद रंग हलका होत नाही l अर्धे शिजल्यानंतर त्यात काळे मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l सतत हलवत रहा l

Step-6

6. साबुदाणा शिजल्या नंतर गॅस बंद करा l आता त्यात तेल आणि कोथिंबीर पट्टी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा l

Step-7

7. साबुदाणा तयार आहे l एका भांडयात काढून घ्या l कोथिंबीर आणि उरलेले ( भाजलेले ) शेंगदाणे ने सजवून घ्या l

गरमा गरम साबुदाणा खिचडीचा आनंद घ्या l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here