भरलेली शिमला मिरची/vibsk–22
साहित्य:-
साहित्य | मात्रा | ||
1 | हिरवी शिमला मिरची | : | 4 नग |
2 | उकडलेले बटाटे | : | 3 (मध्यम आकाराचे) |
3 | कांदा | : | 2 ( बारीक़ कापलेली ) |
4 | हिरवी मिरची | : | 3 ते 4 |
5 | कढी लिंबाची पाने | : | 10 -15 |
6 | ताजी कोथिंबीर | : | 1 जुडी (बारीक़ कापलेली) |
7 | हिंग | : | ½ छोटा चमचा |
8 | ज़ीरे | : | 1 छोटा चमचा |
9 | मोहरीचे दाने | : | 1 छोटा चमचा |
10 | लाल मिरची पावडर | : | 1 छोटा चमचा |
11 | हळद पावडर | : | 1 छोटा चमचा |
12 | अजवाइन | : | ½छोटा चमचा’ |
13 | धने पावडर | : | 1छोटा चमचा |
14 | गरम मसाला | : | ½छोटा चमचा |
15 | आमचूर पावडर | : | 1½छोटा चमचा |
16 | मीठ | : | चवीनुसार |
17 | तूप / तेल / लोणी ( बटर ) | : | 1 मोठा चमचा |
भरलेली शिमला मिरची बनविण्याची कृती :
- सर्वात प्रथम शिमला मिरची वरून कापून घ्या व आतील सर्व बिया काढून टाका एका बाजूला ठेवा l
- आता बटाटे मोठे मोठे कुस्करलेले घ्या व एका बाजूला ठेवा l
- एका पॅन मध्ये तेल गरम करा त्यात मोहरी टाका l
- मोहरीचे दाणे तडतडल्यावर, जीरे, हिंग, कडीपत्ताची पाने, आणि हिरवी मिरची घाला l मिश्रण हळुवार हलवत रहायला हव.l
- आता त्यात कापलेला कांदा घालून तो पर्यंत भाजा, जो पर्यंत कांदा नरम होत नाही l
- आता त्यात , हळदी पावडर,मीठ, अजवाईन, गरम मसाला, आमचूर पावडर, धने पावडर , आणि लाल मिरची पावडर घाला l व कमीत कमी 1 मिनिटे मिश्रणाला हलवत राहा.
- आता कुस्करलेले बटाटे मसाल्यात घालूनचांगल्या प्रकारे मिक्स करा l 7-8 मिनटे मंद आचेवर शिजवा l
- भरण्यासाठी स्टफ्फिंग तयार आहे l आचेवरून उतरवून कापलेली कोथिंबीर मिक्स करून एका बाजूला ठेवा l
- शिमला मिरचीच्या आत बटाटयाचे मिश्रण भरुन एका बाजूला ठेवा l
- आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि आच मंद करा l
- पॅन मध्ये एक एक शिमला मिरची सोडा आणि मंद आचेवर सर्व बाजूने शिजवा l
- सर्व बाजूने शिमला मिरची शिजली कि आचेवरून काढून घ्या l
भरलेली शिमला मिरची दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात गरम गरम सर्व्ह करा l
Watch video here:
Recipe Step By Step With Pics:
Step-1
-
सर्वात प्रथम शिमला मिरची वरून कापून घ्या व आतील सर्व बिया काढून टाका एका बाजूला ठेवा l