भटूरे (छोले/भटूरे)/vibsk–25
साहित्य | मात्रा | ||
1 | मैदा | : | 250 ग्रॅम |
2 | रवा | : | 50 ग्रॅम |
3 | दही | : | 100 ग्रॅम |
4 | बेकिंग पावडर | : | ½ छोटा चमचा |
5 | खाण्याचा सोडा | : | ¼ छोटा चमचा |
6 | मीठ | : | ½ छोटा चमचा |
7 | पिठीसाखर | : | 1½ छोटा चमचा |
8 | तेल | : | 2-3 छोटे चमचे (मैदा मळताना) |
9 | तेल | : | तळण्यासाठी |
10 | हलकेसे गरम पाणी | : | मैदा मळताना वापरणे |
भटूरे बनविन्याची कृती;
- पिठीसाखर,मीठ, रवा, बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा मैद्यात चांगल्या प्रकारे मिक्स करा l
- आता तेल टाका आणि मिक्स करा l
- आता दही घालून नरम मळून घ्या l गरज असेल तर हलके गरम पाणी ही वापरू शकता l
- बंद मुठीच्या मदतीने 7-8 मिनटे नरम मळून घ्या l लक्षात असू द्या, मळलेला मैदा जास्त ओलसर किंवा घट्ट नसावाl
- मळलेल्या मैद्याला थोडे तेल लावून, पातळ ओल्या कपड्याने झाकून ठेवा l 3-4 तासासाठी एका बाजूला ठेवा l
- 3-4 तासानंतर मैदा थोडासा फुलेल l
- हातांना तेल लावून मैद्याला मळून थोडे जास्त नरम करून घ्या l
- मैदा जर ओलसर( चिकट) वाटत असेल तर थोडा सुखा मैदा मिक्स करा l चांगल्या प्रकारे मळून घ्या l
- आता बरोबर आकाराचा गोळा बनवून घ्या l
- गोळ्याला हाताच्या मधोमध फिरवून नरम करून घ्या l
- पोळपाट आणि लाटनीला थोडे तेल लावून घ्या l
- आता गोळ्याला पोळपाटा वर ठेऊन लाटनीच्या मदतीने गोल अथवा अंडाकार आकारात लाटून घ्या l
- तळण्यासाठी कढईत तेल गरम करा l मध्यम आचेवर भटुरे सोनेरी आणि फुगतील, असे तळा l
- भटुरे कढईतून काढून किचन नैपकिन पेपर वर काढून घ्या त्यामुळे व्यतरिक्त तेल निघून जाईल l
- बाकी भटूरेपण अश्या प्रकारे तळून घ्या l
गरमा -गरम भटुरे छोले, लोणचे, सलाद आणि रायता सोबत सर्व्ह करा
Watch video here: