अंड्याची सुखी भाजी/Egg Delight/vibsk–30
साहित्य ;
साहित्य | मात्रा | ||
1 | उकडलेलि अंडी | : | 4 |
2 | हिरवी मिरची | : | 3-4 (बारीक कापलेली) |
3 | कांदा | : | 2 मध्यम आकाराचे (बारीक कापलेले) |
4 | शिमला मिरची: लाल,हिरवी आणि पिवळी | : | एक-एक मध्यम आकाराची ( तीनही मोठे मोठे कापलेली) |
5 | टोमॅटो | : | 2 छोट्या आकाराचे (मोठे मोठे कापलेले) |
6 | मशरूम | : | 5 – 6 (बारीक कापलेले) |
7 | ताजी कोथिंबीर | : | 1 छोटी जुडी (बारीक चिरलेली) |
8 | कांद्याची पात | : | 2 (बारीककापलेली) |
9 | हळद पावडर | : | ½ छोटा चमचा |
10 | लाल मिरची पावडर | : | 1 छोटा चमचा |
11 | मीठ | : | चवीनुसार |
12 | तेल | : | 1½ मोठा चमचा |
कृती ;
- एका पॅन मध्ये तेल गरम करा आणि कापलेला कांदा त्यात टाका l
- कांदा थोडा मऊ झाल्यानंतर हिरवी मिरची, हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून हलवणे l
- कांदा आणि मसाला भाजून झाले कि, आच जलद करून मशरूम घाला आणि थोडे हलवत रहा आता त्यात शिमला मिरची घाला l
- भाजी कुरकुरीत ठेवण्यासाठी आच जलदच ठेवा आणि सतत हलवत रहा झाकण ठेवल्या शिवाय शिजवा l
- 3-4 मिनटे शिजवल्यानंतर कापलेली हिरवी मिरची घाला l
- नंतर सजावटी साठी थोडीसी कांद्याची हिरवी पात वेगळी ठेवा l
- 2 मिनटानंतर टोमॅटो घाला आणि हलवत रहा जलद आचे वर शिजवणे चालू ठेवा l
- उकडलेली अंडी पॅनमध्ये घालून 4-5 मिनटा पर्यंत शिजवा l
- आचेला बंद करा आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर ने सजवून घ्या l
अंड्यांना 2 किंवा 4 भागात कापून गरमा गरम सर्व्ह करा l
Watch video here: